शेतकऱ्यांनो नियमित पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक व महत्त्वपूर्ण असा अपडेट्स समोर येत आहे राज्यांमधील अनेक शेतकरी वेळेवर कर्जफेड करून आपली आर्थिक स्थिती राखत असतात परंतु अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना राबवली जात असून या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना त्यांच्या पीक कर्जावरील व्याजाचा काही भाग किंवा संपूर्ण व्याज परत दिले जाते
आता याच योजनेच्या संदर्भात एक मोठा बदल करण्यात आलेला असून व्याजाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या (Direct Benefit Transfer) माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झाली आहे पूर्वी या योजनेअंतर्गत व्याजाची रक्कम थेट बँकेकडे दिली जात होती यामुळे अनेक शेतकऱ्यांना नेमकी किती सवलत मिळाली किंवा व्याजाचा फायदा झाला की नाही याची स्पष्ट माहिती मिळत नव्हती व काही वेळा शेतकऱ्यांकडून तक्रारीदेखील करण्यात येत होत्या की त्यांना या योजनेचा लाभ प्रत्यक्षात दिसत नाही सर्व समस्या लक्षात घेऊन शासनाने मोठा निर्णय घेत घेतला आहे
आता व्याजाचा परतावा थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केला जात असल्यामुळे पारदर्शकता वाढले आहे व शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळत आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर कर्जफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे असून त्यांच्या आर्थिक ताणात कमी करणे केंद्र शासनाच्या माध्यमातून (Kisan Credit Card) केसीसी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेल्या कर्जावर देखील काही प्रमाणामध्ये व्याज सवलती दिल्या जातात त्यातच राज्य शासनाची
ही योजना मिळून शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील मिळतो परिणामी जवळ जवळ 3 लाख रुपये पर्यंत पीक कर्ज शेतकरी बिनव्याजी किंवा अत्यल्प व्याजा दारात उपलब्ध होऊ शकते यामुळे शेतकऱ्यांना बँका वरील विश्वास अधिक वाढतो आणि नियमितपणे कर्जफेड करण्याकडे वळतात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च जसे की बियाणे खते औषधी मजुरी इत्यादी भाग घेण्याकरिता शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत असते
अशा परिस्थितीत व्याज सवलत योजना त्यांच्या दृष्टीने खूपच महत्वपूर्ण ठरत आहे वेळेवर कर्जफेड केल्यास व्याज परत मिळते जाणीव शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थिती निर्माण करते सध्या राज्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत व्याजाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे तुम्ही देखील नियमितपणे तुमचे पिक कर्ज फेडले असेल तर तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे का हे नक्की तपासा व बँक पासबुक मोबाईल नंबर एसेमेस किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही माहिती पाहू शकता
जर तुमच्या खात्यामध्ये अध्याप रक्कम जमा झाली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही काहीवेळा प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू आहे यामुळे थोडा उशीर होऊ शकतो तरीसुद्धा तुम्ही संबंधित बँक शाखेशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती देऊ शकता तसेच तुमचे कर्ज खाते आधार लिंकिंग आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य आहेत का हे देखील तपासू शकतो या एकूणच पाहता पंजाबराव देशमुख कृषि व्याज सवलत योजना ही शेतकऱ्यांकरिता अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक योजना आहे
थेट खात्यात पैसे जमा होण्याच्या नियमामुळे पारदर्शकता वाढले असून शेतकऱ्यांचा विश्वास देखील अधिक दृढ झाला आहे अशा योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत म्हणूनच तुम्ही नियमितपणे कर्जफेड करत रहा आणि इतर शेतकऱ्यांनाही याबद्दल माहिती द्या तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर तुमचा अनुभव इतरांबरोबर शेअर करा आणि आले नसतील योग्य ठिकाणी चौकशी करून तुमचा हक्काचा लाभ नक्की मिळवा
