Solar Sprayer Pump subsidy Maharashtra 2026 Online apply | सोलर फवारणी पंपासाठी 50% अनुदान अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत विविध योजनेचे अंमलबजावणी केली जात असते आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत अनेक यंत्र सामग्रीवर अनुदान देखील दिले जाते यामध्ये स्वरचलित फवारणी यंत्र (Solar Operated Knapsack Sprayer) हे अत्यंत उपयुक्त बाब असून शेतकऱ्यांना घ्या यंत्राच्या खरेदीसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध केले जाते

फवारणी करताना बॅटरी चार्जिंगची समस्या इंधन खर्च किंवा हाताने फवारणी करताना होणारा शारीरिक त्रास कमी करण्यासाठी सोलर फवारणी यंत्र प्रभावी ठरत आहे यामुळे राज्यांमधील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत या लेखांमध्ये सोलर फवारणी पंपासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अनुदान किती मिळते व संपूर्ण अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत

सोलर फवारणी यंत्र योजना काय आहे

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे उपलब्ध यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देखील दिले जाते Solar Operated Knapsack Sprayer या योजनेच्या माध्यमातून स्वयंचलित ने प्रत्येक फवारणी यंत्र खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते हे यंत्र स्वर ऊर्जा वर चालत असल्यामुळे विजेचा किंवा इंधनाचा अतिरिक्त खर्च देखील होतो तसेच कमी वेळेत अधिक क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होते

सोलर फवारणी यंत्र चे फायदे काय !

  1. वीज किंवा इंधन खर्च नाही सौर उर्जेवर चालत असल्यामुळे अतिरिक्त खर्च कमी होतो
  2. वेळेची बचत होते हाताने फवारणी करण्या पेक्षा कमी वेळेत अधिक क्षेत्रावर फवारणी करता येऊ शकते
  3. मजुरीच्या खर्चात बचत कामावरील अवलंबित्व कमी होते
  4. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान सौर ऊर्जा चा वापर असल्यामुळे पर्यावरणाला हानी देखील पोहोचत नाही
  5. फवारण्याची कार्यक्षमता वाढणार समान दाबाने फवारणी होत असल्यामुळे औषधाचा योग्य वापर होत असतो

Solar Sprayer Pump subsidy Maharashtra 2026 योजनेमध्ये किती अनुदान मिळणार

सोलर पवारणी यंत्र खरेदीसाठी कृषी विभागामार्फत 50 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाते पूर्वी काही योजनेमध्ये जसे की सोयाबीन आणि कापूस मूल्य साखळी विकास कार्यक्रमांतर्गत काही घटकावर शंभर टक्के अनुदान दिले जाते मात्र सध्या कृषी यांत्रिकीकरण योजने ( अंतर्गत स्वयंचलित फवारणी यंत्र साठी साधारणता 50 टक्के अनुदान दिले जाते अनुदानाची रक्कम शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी बदलू शकते

अर्ज करण्याकरिता पात्रता

Solar Sprayer Pump subsidy Maharashtra 2026 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे

  • अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असावा
  • महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी केलेली असावी
  • फार्मर आयडी उपलब्ध असावा
  • मोबाईल क्रमांक farmer ID सी लिंग असावा
  • अर्जदाराच्या नावावरती शेत जमीन असावी
  • शासनाच्या नियमानुसार पात्र असणे आवश्यक आहे

लाभार्थ्या साठी आवश्यक ते डॉक्युमेंट

सामान्यता या कागदपत्राची आवश्यकता लागते :

आधार कार्ड
7/12 उतारा
फार्मर आयडी
8अ उतारा
बँक पासबुक
मोबाइल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
इतर आवश्यक कागदपत्रे

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज कसा करायचा

सोलर फवारणी यंत्र साठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असते

  • चरण 1 : महाडीबीटी पोर्टल वर जा सर्वप्रथम महाडीबीटी फॉर्म पोर्टल उघडा
  • चरण 2 : लॉगिन करा
  • फार्मर आयडी टाका
  • ओटीपी मागवा
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी भरा
  • ओटीपी पडताळणी करुन लॉग इन करा
  • चरण 3 : प्रोफाईल तपासा लॉगिन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण आहे का ते तपासा अपूर्ण माहिती असल्यास ते भरून घ्या

घटका करिता अर्ज कसा करावा चरण चार

  • चरण 4 : घटकासाठी अर्ज निवडा डाव्या बाजूला दिसणार्‍या घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा
  • चरण 5 : कृषी यांत्रिकीकरण थोडा विविध विभागात पैकी कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडा
  • चरण 6 : तालुका निवडा ज्यात तालुक्यामध्ये तुमची जमीन आहे तो तालुका निवडायचा आहे

मुख्य घटक निवडायची प्रक्रिया

तालुका निवडल्यानंतर खालीलप्रमाणे पर्याय निवडले चे आहे

  1. मुख्य शाखा कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य
  2. उपघटक मनुष्य चलित अवजारे
  3. यांत्र सामग्री प्रकार
  4. पीक संरक्षण अवजारे
  5. अंतिम निवड
  6. स्वयंचलित फवारणी हा पर्याय निवडल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी

अटी व शर्ती पूर्ण करावी

घटक निवडल्यानंतर शासनाच्या अटी व शर्ती स्वीकाराव्यात लागतात यामध्ये सामान्य पूर्वसंमती शिव्या खरेदी न करण्याबाबतची समाविष्ट असते अट मान्य करून जतन करा या नावावर क्लिक करा

अर्ज सादर करण्यासाठी अंतिम प्रक्रिया

अनेक शेतकरी फक्त घटक निवडून प्रक्रिया अर्धवट सोडतात त्यामुळे अर्ज पूर्ण होत नाही पुढील प्रक्रिया अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक निवडलेला घटक तपासा मार्गदर्शक सूचना वाचा अंतिम अर्ज सादर करा

अर्जाची शुल्क किती असते

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागू शकते सध्या अर्जासाठी अंदाजे 23 ते 60 पैसे शुल्क आकारले जाऊ शकते जर यापूर्वी शुल्क भरलेले असेल तर शुल्क भरण्याची आवश्यकता नसते

ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया

पेमेंट करताना खालील पर्याय उपलब्ध असतात

UPi , नेट बँकिंग,डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड निवडल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करून शुल्क भरता येऊ शकते पेमेंट यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर अर्ज यशस्वी झाले संदेश दिसतो

अर्ज यशस्वी झाला का कसे पाहायचे

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अर्ज क्रमांक (Application number) उपलब्ध होतो त्यांना घटक तपशील Component Details लागू केलेले घटक Applied Components

या विभागांमध्ये जाऊन आपण निवडलेली बाबा दिसते का ते तपासू शकता जर स्वयंचलित फवारणी यंत्राची बाब दिसत असेल तर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर झालेला आहे

निवड झाल्यानंतर पुढे काय करायचे

अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडून सोडत प्रक्रिया हाताळणी प्रक्रिया राबवली जाते लाभार्थी निवड झाल्यानंतर मोबाईल नंबर वर संदेश येतो महाडीबीटी पोर्टल वर माहिती अपडेट होते पुढील कार्यवाही बाबत सूचना दिल्या जातात त्यानंतर शासनाच्या नियमानुसार की यंत्र खरेदी करून अनुदानाचा लाभ दिला जातो

तुमच्यासाठी खास योजना 2026

WhatsApp group येथे भेट द्या
Facebook page येथे भेट द्या
सोलर फवारणी यंत्र शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचे असू शकते

आजच्या काळात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे असून वाढती मजुरी दर कामगारांची कमतरता आणि उत्पादन खर्च यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळत आहे सोलर फवारणी यंत्रामुळे खर्च कमी होतो वेळ व उत्पादन क्षमता वाढ होते फवारणी अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते शेतकऱ्याचा शारीरिक ताण कमी होतो यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वयंचलित फवारणी यंत्र खरेदीसाठी 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते महाडीबीटी फार्म पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात अर्ज करताना योग्य घटक निवडणे अर्ज सादर करणे आणि शुल्क भरुन प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर महाडीबीटी पोर्टल वर जाऊन सोलर फवारणी यंत्र साठी अर्ज करून शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्या

FAQ

प्रश्न 1 सोलर फवारणी यंत्र साठी किती अनुदान मिळू शकते

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत साधारणपणे 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते

प्रश्न 2 अर्ज कोठे करायचा आहे

महाडीबीटी farmer portal पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो

प्रश्न 3 अर्ज शुल्क किती असतो

सध्या अंदाजे 23.60 रुपये शुल्क आकारले जाते

प्रश्न 4 सोलर पंप फवारणी यंत्र कोणत्या घटका निवडायचे आहे

कृषी यांत्रिकरण मनुष्यचलित अवजारे पीक संरक्षण अवजारे संचालित नेपसेक फवारणी यंत्र

प्रश्न 5 लाभार्थी निवड कशी होत आहे

शासनाच्या नियमानुसार सोडत किंवा हाताळणी प्रक्रिया द्वारे लाभार्थी निवड केली जातात

Leave a Comment