सध्या राज्यात फेब्रुवारी आणि मार्च 2026 या कालावधीत मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले ते मात्र या अपेक्षित हवामान बदलामुळे पिकांचे नुकसान व उत्पादन घट व आर्थिक तोटा सहन करावा लागत लागला या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत मोठा निर्णय घेतला असून तब्बल 1,69,889 शेतकऱ्यांसाठी सुमारे 166 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे
सरकारचा मोठा निर्णय
18 मे 2026 रोजी शासनाने या संदर्भात दोन महत्त्वाचे शासन निर्णय जीआर (GR) जारी केले या निर्णयानुसार राज्यातील 22 जिल्ह्यामधील पात्र शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे विशेष म्हणजे एका हंगामात एका शेतकऱ्याला 2 वेळा नुकसान भरपाई दिली जाणार नाही असा नियम देखील लागू करण्यात आला आहे यामुळे मदतीचे वितरण अधिक पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने होणार आहे
पुणे विभागामधील नुकसान भरपाई
पुणे विभागाचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातील 8 हजार 509 शेतकऱ्यांना सुमारे 7 कोटी 13 लाख 37 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून तरी सांगली जिल्ह्यातील तीन हजार 117 शेतकऱ्यांना तीन कोटी 38 लाख 95 हजार रुपयांची मदत देण्यात पुणे विभागातील एकूण 11 हजार 626 शेतकऱ्यांना 10 कोटी 52 लाख 32 हजार रुपयांची भरपाई मंजूर झाले आहे मात्र सातारा जिल्ह्यातील नुकसान झाले असतानाही त्यांचा अद्याप या यादीत समावेश करण्यात आलेला नाही ही लक्ष वेधणारी आहे
नागपूर विभागातील स्थिती
नागपूर विभागातही काही प्रमाणामध्ये मदत जाहीर करण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यातील 250 शेतकऱ्यांना 25 लाख 20 हजार रुपये व चंद्रपूर जिल्ह्यातील 846 शेतकऱ्यांना 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे याशिवाय फेब्रुवारी महिन्यात नुकसान झालेल्या नागपूर जिल्ह्यातील 746 शेतकऱ्यांना 1 कोटी 14 लाख 67 हजार रुपयांची मदत मिळणार आहे भंडारा जिल्ह्यातील 105 शेतकऱ्यांना सुमारे 2 लाख रुपये तर गडचिरोली जिल्ह्यातील 443 शेतकऱ्यांना 36 लाख 75 हजार रुपये मंजूर करण्यात आले
कोकणामधील आंबा उत्पादकांना दिलासा
कोकण विभागातील विशेष म्हणजे आंबा उत्पादन शेतकऱ्यांना मोठा फटका देखील बसला आहे होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 221 शेतकऱ्यांना 12 लाख 67 हजार रुपये तर रत्नागिरी जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांना 11 लाख 46 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आंबा बागायतदारांसाठी ही मदत महत्त्वाची मानली जाते
छत्रपती संभाजी नगर विभाग
या विभागात नांदेड जिल्ह्यातील 496 शेतकऱ्यांना 23 लाख 68 हजार रुपये धाराशिव जिल्ह्यातील 3,315 शेतकऱ्यांना 3 कोटी 39 लाख 36 हजार रुपये जालना जिल्ह्यातील 2857 शेतकऱ्यांना 2 कोटी 52 लाख 90 हजार रुपये मंजूर झाले आहेत लातूर जिल्ह्यातील 156 शेतकऱ्यांना 21 लाख 25 हजार रुपये तर हिंगोली जिल्ह्यातील 498 शेतकऱ्यांना 45 लाख तीन हजार रुपये मिळणार आहेत या विभागातील एकूण 7 हजार 322 शेतकऱ्यांना सुमारे 6 कोटी 68 लाख 22 हजार रुपयांची मदत मंजूर झाले आहे
अमरावती विभाग
अमरावती जिल्ह्यातील 475 शेतकऱ्यांना 22 लाख 95 हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यातील 77 शेतकऱ्यांना 12 लाख 71 हजार रुपये व वाशिम जिल्ह्यातील 9 शेतकऱ्यांना 77 हजार रुपये मंजूर झाले आहेत
| GR महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर maharashtra.gov.in पाहू शकता |
| GR 18-मे-2026 |
| GR |
नाशिक विभागातील सर्वाधिक मदत
यातील नाशिक विभाग हा या मदतीचा सर्वात मोठा लाभार्थी ठरला असून नाशिक जिल्ह्यामधील तब्बल 65 हजार 756 शेतकऱ्यांना 73 कोटी 34 लाख 94 हजार रुपये मंजूर झाले आहेत धुळे जिल्ह्यातील 14 हजार 275 शेतकऱ्यांना 15 कोटी 51 लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील 953 शेतकऱ्यांना 66 लाख 57 हजार रुपये जळगाव जिल्ह्यातील 37 हजार 991 शेतकऱ्यांना 31 कोटी 14 लाख रुपये व अहिल्या नगर जिल्ह्यातील 27 हजार 602 शेतकऱ्यांना 25 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत त्या विभागातील एकूण 1 लाख 46 हजार 577 शेतकऱ्यांना तब्बल 145 कोटी 87 लाख 70 हजार रुपये मदत मंजूर झाली आहे
एकूण नुकसानभरपाईचा आढावा
एकूणच राज्यातील 1,69,889 शेतकऱ्यांना 166 कोटी रुपयांची नुकसान भरपाई या दोन शासन निर्णय नुसार मंजूर करण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक वाटा नाशिक विभागाचा जास्त आहे
अनुदान कधी मिळणार
ही नुकसान भरपाई जून 2026 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळेल
महत्त्वपूर्ण सूचना
- एका हंगामात 2 वेळा नुकसान भरपाई मिळणार नाही
- बँक खाते आधार सी लिंक करणे आवश्यक
- केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे
- शासनाच्या यादीत नाव असणे महत्त्वाचे आहे
निष्कर्ष
अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरू शकते शासनाने घेतलेला हा निर्णय दिलासादायक असून उर्वरित जिल्हे लवकरच सामावेश होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते
