POCRA 2.0 Krushi Avajare Bank Yojana : महिलांसाठी मोठी संधी! 60% अनुदान, मिळणार 24 लाखापर्यंत लाभ

राज्यातील एक महत्त्वाची आणि मोठी संधी उपलब्ध झाली आहे Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project Phase 2 म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत महिला बचत गटांना अवजार बँक (Farm Equipment Bank ) स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिले जाणार आहे

या योजनेअंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रकल्पाच्या किमतीच्या 60 टक्‍क्‍यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 24 लाख रुपये अनुदान मिळू शकते विशेष म्हणजे या योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक महिला बचत गटांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे यामुळे महिला बचत गटांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करणे खूप महत्त्वाचे आहे

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project Phase 2 काय आहे

राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project Phase 2 अंतर्गत विशेष कृषी विषयक उपक्रम राबवले जात आहेत या प्रकल्पाचा उद्देश म्हणजेच शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शेती अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे या प्रकल्पामध्ये महिला लाभार्थ्यांसाठी बाब म्हणून Farm Equipment Bank म्हणजेच अवजार बँक स्थापना काढण्याची सुविधा देण्यात आले आहे

या आजारावर बँकेच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे विविध कृषी अवजारे व यंत्रे उपलब्ध करून घेता येणार आहे यामुळे महिला बचत गटांना स्वतःच्या गटासाठी कृषी यंत्रसामग्री उभा करण्याबरोबरच गावातील इतर शेतकऱ्यांना ही आवश्यकतेप्रमाणे ही अवजारे उपलब्ध करून देण्याची संधी मिळू देणार

24 लाखाचे अनुदान कसे मिळणार

योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 60% subsidy म्हणजेच प्रकल्प खर्चाच्या 60 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या अनुदानाची कमाल मर्यादा 24 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे उदाहरणार्थ एखाद्या महिला बचत गटाने वीस लाख रुपयाचा Farm Equipment Bank project तयार केला तर 60 टक्के प्रमाणानुसार सुमारे 12 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते याप्रमाणे प्रकल्पाची किंमत 31 लाख रुपये असल्यास 60 टक्के रक्कम 18 लाख रुपये होते यामुळे पात्रतेनुसार 18 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते जर प्रकल्पाची किंमत 40 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अनुदानाची कमाल मर्यादा 24 लाख रुपये राहणार आहे म्हणजेच प्रकल्पाची किंमत कितीही मोठी असली तरी या योजनेअंतर्गत मिळणारे कामाला अनुदान 24 लाख रुपयांपेक्षा जास्त असणार नाही

20 लाखांपेक्षा जास्त प्रकल्पाकरिता कर्ज आवश्यक आहे का?

या योजनेमध्ये एक महत्त्वाची अट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे जर अवजार बँकेचा प्रकल्प 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा असेल तर संबंधित महिला बचत गटांना आवश्यक रकमेचा बँक लोन घेणे बंधनकारक असू शकते यामुळे मोठ्या प्रमाणात प्रकल्पासाठी अर्ज करण्यापूर्वी महिला बचत गटाने स्वतःचा आर्थिक सहभाग कर्जाची उपलब्धता व प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची याचा विचार करणे महत्त्वाचे असेल

कोणत्या प्रकारच्या महिला बचत गटांना अर्ज करता येणार

  • या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिला बचत गट पात्र असणे आवश्यक असेल
  • महिला बचत गटांमध्ये किमान 10 महिला सदस्य आवश्यक आहे
  • या सदस्याचा समावेश वेगवेगळ्या कुटुंबा मधून असणे अपेक्षित आहे
  • येथे कुटुंबाची व्याख्या समजून घेणे महत्त्वाचे ठरेल पीएम किसान योजनेनुसार पती-पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले यांना एक कुटुंब मानले जाते यामुळे या कुटुंबाच्या व्याख्येनुसार वेगवेगळ्या कुटुंबातील महिला सदस्याचा बचत गट असणे आवश्यक असेल

याशिवाय MSRLM/MAVIM पुरस्कृत महिला बचत गट आणि गाव संग यांना या उपक्रमासाठी पात्रतेनुसार अर्ज करता येऊ शकतो

एका गावामध्ये किती अवजार बँक

या योजनेअंतर्गत एक गावामध्ये एक Farm Equipment Bank स्थापन करण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात येते आहे यामुळे एखाद्या गावातून एकापेक्षा जास्त पात्र महिला बचत गटांनी अर्ज केलेल्या केल्यास संबंधित गटाची निवड Lottery System म्हणजेच लॉटरी पद्धतीने केली जाते यामुळे हा अर्ज केला म्हणजेच प्रत्येक गटाला अनुदान मिळेलच असे होणार नाही उपलब्ध लक्षात पात्रता कागदपत्राची पूर्तता व निवड प्रकारे प्रमाणे लाभार्थी गटाची निवड केली जाईल

यापूर्वी लाभ घेतला असेल त्या गटाचे काय

ज्या महिला बचत गटाने यापूर्वी Farm Equipment Bank किंवा अवजार बँकेचा लाभ घेतला असेल अशा गटांना पुन्हा याचा घटकासाठी लाभ मिळण्यास पात्रता नसू शकते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या बचत गटाने पुर्वी कोणत्या लाभ घेतला आहे याची माहिती असणे आवश्यक असेल

अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने संबंधित Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project DBT Portal वर केली जाणार आहे प्रथम संबंधित महिला बचत गटाची पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक असेल नोंदणी झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या संबंधित कार्य पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते अर्ज प्रक्रिया Farmer Producer Organization (FPO) संबंधित पाऱ्याचा वापर करून महिला बचत गटाने माहिती नोंदविण्याची प्रक्रिया करावी लागू शकते ज्या महिला बचत गटाने पोर्टलवर नोंदणी झालेली आहे त्यांनी संबंधित पोर्टल वर करून उपलब्ध अर्ज प्रक्रियेची माहिती तपासावी

योजने साठी कागदपत्रे कोणते लागतात

अर्ज करताना महिला बचत गटाची संबंधित विविध कागदपत्रांची आवश्यकता असते यामुळे बचत गटाने नोंदणी सदस्यांची माहिती गटाचे बँक खाते बँक स्टेटमेंट मागील आर्थिक व्यवहाराची माहिती व त्याची संबंधित आवश्यक कागदपत्रांचा समावेश करावा विशेष म्हणजे बचत गटाच्या मागील आर्थिक व्यवहाराची माहिती आणि बँक स्टेटमेंट महत्त्वाचे ठरू शकते म्हणून अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवणे आवश्यक असेल कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे अर्ज प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात

पुन्हा अर्ज का मागविण्यात आले आहे

यापूर्वी देखील या पदासाठी महिला बचत गटांकडून अर्ज मागवण्यात आले होते मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते मात्र काही अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे किंवा निवड झाल्यानंतर पुढील अंमलबजावणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे तसेच उपलब्ध लक्ष काळानुसार आवश्यक प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहे यापूर्वी अर्ज करण्याची संधी चुकलेल्या किंवा पात्र असूनही आज न केलेल्या महिला बचत गटांसाठी ही पुन्हा एकदा महत्त्वाची संधी आहे

फेसबुक पेज येथे पहा
व्हाट्सअप ग्रुप येथे पहा

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या योजनेकरिता महिला बचत गटांना 31ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे त्यामुळे पात्र महिला बचत गटाने शेवट दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे योग्य ठरेल

अर्ज करण्याच्या पूर्वी काही गोष्टी तपासा

अर्ज करण्यापूर्वी आपल्या महिला बचत गटांमध्ये किमान दहा पात्र सदस्य आहे का त्या वेगवेगळ्या कुटुंबातील आहे का गटाची नोंदणी झालेली आहे का आवश्यक बँक खाते कागदपत्रे उपलब्ध आहे का व यापूर्वी अवजार बँकेचा लाभ घेतलेला नाही ना याची पूर्णता खात्री करावी तसेच मोठ्या किमतीच्या प्रकल्प उभारण्याचा विचार असल्यास त्यामुळे लागणाऱ्या स्व ताच्या सहभागाची रक्कम आणि Bank Loan मिळण्याची शक्यता त्याचाही विचार करावे

महिलांकरिता का महत्वाचे आहे योजना

ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना आर्थिक दृष्ट्या आणि कृषी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते जर बँक उभारल्यामुळे महिला बचत गटाला आधुनिक कृषी यंत्रसामग्री उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते गावातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी आवश्यक असलेली अवजारे उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून बचत गटाला उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्रोत निर्माण करण्याची संधी मिळू शकते त्यामुळे केवळ अनुदान मिळणे एवढे पुरतेच ही योजना मर्यादित नसून योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास महिला बचत गट गटासाठी दीर्घकालीन आर्थिक उपक्रम उभारण्याची संधी निर्माण होऊ शकते

निष्कर्ष

एकंदरीत Deshmukh Krushi Sanjivani Project Phase 2 अंतर्गत महिला बचत गटासाठी Farm Equipment Bank स्थापन करण्याची ही महत्त्वाची संधी असून या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 60 टक्‍क्‍यांपर्यंत जास्तीत जास्त 24 लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळू शकते किमान 10 महिला सदस्य असलेल्या पात्र महिला बचत गट योजनेकरिता अर्ज करू शकते एका गावामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने होऊ शकते यामुळे अवजारे बँक त्यांना घेतलेल्या गटांना पुन्हा लाभ मिळण्याचा पात्रता नसू शकते इच्छुक महिला बचत गटाने 31 ऑगस्ट 2026 अंतिम तारीख घेऊन संबंधित ची Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project DBT Portal वर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत मार्गदर्शक सूचना व पात्रता व कागदपत्राची माहिती काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे

Leave a Comment