मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 : 50 शेळ्या 5 बोकड युनिटसाठी 75% टक्के पर्यंत अनुदान पात्रता व कागदपत्रे

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चालवली जाणारी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत आता शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना साठी अनुदान दिले जाणार आहे या योजनेमध्ये 50 शेळ्या आणि पाच बोकड युनिटसाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान मिळण्याची तरतूद आहे

या योजनेचे ऑनलाईन अर्ज 26 नोव्हेंबर 2026 पासून महाडीबीटी 2.0 पोर्टल वर सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली ग्रामीण भागामधील शेतकरी बेरोजगार युवक महिला बचत गट आणि शेळीपालन व्यवसाय सुरू करू इच्छिता नाऱ्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची संधी आहे

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना काय आहे

राज्यातील ग्रामीण भागामध्ये पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतकरी व ग्रामीण नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेळी पालन मेंढी पालन कुकुट पालन आणि वराहपालन यासारख्या पशुधन व्यवसायासाठी विविध अनुदानित योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे यापैकी वैयक्तिक लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना सहा शेळी-मेंढी महामंडळाच्या योजनेचा समावेश असून एकूण 21 योजनेसाठी अर्ज करता येणार आहे

50 शेळ्या व पाच बोकड युनिट साठी किती अनुदान मिळणार आहे

या योजनेअंतर्गत 50 शेळ्या आणि पाच बोकड युनिट उभारण्यासाठी एकूण प्रकल्प खर्च अंदाजे 11 लाख 38 हजार 554 रुपये निश्चित करण्यात आला आहे सर्व प्रवर्गानुसार मिळणारे अनुदान खालील प्रमाणे आहे

लाभार्थी प्रवर्ग अंदाजे प्रमाण अंदाजे अनुदान
खुला प्रवर्ग 50%5,69,277
अनुसूचित जाती (SC)75%8,53,916
अनुसूचित जमाती (ST)75%8,53,916

अनुदानाची रक्कम प्रकल्पाच्या मंजूर खर्चानुसार दिली जाणार असून उर्वरित रक्कम लाभार्थ्याला स्वतःच्या आर्थिक क्षमतेनुसार उभारावी लागू शकते

शेळीपालन प्रकल्पासाठी खर्चाचे वितरण

50 शेळ्या आणि पाच बोकड युनिट साठी प्रकल्पामध्ये शेळ्या बोकड विमा शेड आणि आवश्यक साहित्य याचा समावेश करण्यात आला आहे त्यातील घटक अंदाजे खर्च 50 शेळ्या व पाच बोकड खरेदी

या प्रकल्पामध्ये शेळ्या व बोकड खरेदी करण्याबरोबरच पशुधना साठी शेड विमा आणि व्यवसाय साठी आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे

mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana 2026 योजनेसाठी पात्रता व अटी

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना अटीची पूर्तता करावी लागणार आहे

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
  • अर्ज दाराकडे स्वतःची किमान एक एकर जमीन असणे महत्त्वाचे आहे किंवा पाच वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार असावा
  • वन पट्टा धारकांना जमिनीच्या अटी मध्ये नियमानुसार सूट देण्यात येणार आहे
  • फार्मर आयटीआय असणे महत्वाचे आहे
  • पशुपालन किंवा दूध व्यवसायाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदान मिळण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याचे हमीपत्र सादर करावे लागू शकते
  • शेळी पालन व्यवसाय चा दोन वर्षाचा अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र सादर करता येईल
  • एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे
  • यापूर्वी संबंधित पशुसंवर्धन योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना नियमानुसार अपात्र ठरवले जाऊ शकते लाभार्थ्यांना शासनाचा निर्धारित नियम व अटी ची पूर्तता करणे आवश्यक आहे
  • अल्पभूधारक अत्यल्पभूधारक आणि महिला बचत गटांना लाभ देताना प्राधान्य दिले जाण्याची तरतूद आहे

आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज त्यांना खालील कागदपत्रे आवश्यक असू शकते

  • आधार कार्ड
  • फार्मर आयडी
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जमिनीचा सातबारा व संबंधित जमिनीचे कागदपत्र वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार लागू असल्यास पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा प्रशिक्षण देण्याचे हमी पत्र
  • शेळीपालन व्यवसाय अनुभव प्रमाणपत्र लागू असल्यास जातीचा दाखला एससी एसटी लाभार्थ्यांसाठी बचत गटाचे प्रमाणपत्र महिला बचत गटासाठी बँक खाते तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

इतर आवश्यक घोषणा पत्रे व हमी पत्रे अर्ज करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टल संबंधित योजनेसाठी दिलेली कागदपत्रे अधिकृत यादी तपासणे आवश्यक आहे

अनुदान कशा पद्धतीने मिळणार

या योजनेअंतर्गत अनुदान दोन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे

पहिला टप्पा : लाभार्थ्यांनी मंजूर नियमानुसार शेळी पालन शेड तयार करणे आवश्यक यंत्र सामग्री खरेदी करणे आणि संबंधित कामे पूर्ण करणे आवश्यक असेल त्यानंतर विभागाकडून पाहणी तपासणी केली जाईल तपासणी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील अनुदान दिले जाईल

दुसरा टप्पा : पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करून मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्याला शेळ्या व बोकड खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जाईल पशुधन खरेदी व प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित अनुदानाचा टप्पा पुढे पूर्ण केला जाईल

यामुळे लाभार्थ्यांनी अर्ज मंजूर होण्यापूर्वी किंवा अधिकृत परवानगी मिळण्यापूर्वी पशुधन खरेदी करू नये

शेळ्या खरेदी साठी महत्त्वाचे नियम

या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या शेळ्या व मेंढ्या निर्धारित वयोगटातील असणे आवश्यक आहे उपलब्ध माहितीनुसार खरेदी करण्यात येणाऱ्या शेळ्या व मेंढ्या साधारणता एक ते तीन वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे खरेदी केलेल्या पशुधनाचा तीन वर्षाचा विमा उभारण्यात येणार आहे विमा व पशुधनाचा संबंधित नियमाची पूर्तता संबंधित पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनानुसार करावी लागेल

महाडीबीटी 2.0 पोर्टल वर अर्ज कसा करावा

या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी 2.0 करता’ येणार आहे महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या महा आयडी च्या माध्यमातून लॉग इन करा आपले लाभार्थी प्रोफाईल पूर्ण करा पशु विभागातील उपलब्ध योजना निवडा

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन व उद्योजकता योजनेतील 50 शेळ्या व पाच बोकड युनियन एवढा आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करून अर्जाची पावती व अर्ज क्रमांक जतन करा अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पोर्टलवर उपलब्ध पर्याय व सूचना याचे पालन करून अर्ज करणे आवश्यक आहे

निष्कर्ष

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन व उद्योजकता योजना 2026 ग्रामीण भागातील नागरिकांना शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगली संधी ठरू शकते 50 शेळ्या व पाच बोकड युनिटसाठी 11,38,554 रुपयांचा प्रकल्प असून खुल्या प्रवर्गासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गासाठी 75 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान मिळण्याची तरतूद आहे

या योजनेच्या अर्ज 26 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी आपला फार्मर आयडी जमिनीचे कागदपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे

Leave a Comment