ग्रामीण भागातील तरुणांना पशुपालकांना उद्योजक बनण्याची संधी निर्माण करून देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आणि याच योजनेचे अर्ज कधी सुरू होणार ही योजना बंद झाली का किंवा या योजनेसाठी अमुक अमुक व्यक्तीकडेच कागदपत्र देऊन अर्ज भरता येणार का अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्न या योजनेच्या संदर्भात निर्माण झालेले आहेत
Mahadbt Pashudhan Yojana 2026 : कारण या योजनेचे अद्यापपर्यंत अर्ज सुरू झालेले आहेत मग या योजनेचे नेमके अर्ज अर्ज कधी सुरू होणार हा एक मोठा पडलेला प्रश्न आहे मित्रांनो एक मे 2026 पासून ही योजना सुरू होणार होती याच्यानंतर याच्यामध्ये काही काम बाकी असल्यामुळे किंवा याच्यामध्ये काही आक्षेप आल्यामुळे या योजनेच्या संदर्भात पुढे ढकलण्यात आलं साधारणपणे आता 20 मे जे काही आपला पशुसंवर्धन विभाग दिन होता त्या दिवशी याचं सुरुवात केली जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आल्या परंतु 20 तारखेला याचे अर्ज सुरू करण्यात आले नाही
तर मग नेमके अर्ज कधी सुरू होणार याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली गेली अखेर पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अधिकृत ही योजना कधी सुरू होणार याच्याबद्दलचा अपडेट देण्यात आलेला आहे. मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागात ग्रामीण भागामध्ये काही एजंटच्या माध्यमातून कागदपत्र गोळा केली जात आहेत आणि या योजनेचा अर्ज करून दिला जाईल अशा प्रकारे सांगून फी साकारली जाते त्याच्या संदर्भातील सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात मोठ्या किमतीला विकली जात आहेत याच्या संदर्भातील मोठ्या प्रमाणात तक्रारी पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झालेले आहेत याचबरोबर या योजनेसाठी एक अद्यावत असं महाडीबीटी च पोर्टल तयार करण्यात येत आहे जे एक तारखेलाच लॉन्च केलं जाणार होतं परंतु याच्यामध्ये काही आणखीन तांत्रिक बिघाड असल्यामुळे काही याच्यामध्ये आणखीनही सुविधा सुधारणा करण्याची गरज असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.
पशुसंवर्धन विभागाच्या या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातूनच ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पशुपालकाला ग्रामीण भागातील तरुणांना स्वतः घर बसल्या अर्ज करता येणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये एजंट किंवा कुठल्या अमुक अमुक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच अर्ज करण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारची सुविधा याच्या अंतर्गत निर्माण केली जात आहे. या पोर्टलवरती सुरू करण्यासाठी आणखीन काही तांत्रिक बाबीची गरज आहे. त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिगाड आहेत जे पूर्णपणे दुरुस्त केले जातील आणि ते पोर्टल लॉन्च केल जाईल.
मग आता हे पोर्टल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना नेमकं कळणार कसं? तर मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पोर्टल सुरू करण्यापूर्वीच याच्या संदर्भातील एक जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि शेतकऱ्यांना पशुपालकांना अर्ज करण्यासाठीच आव्हान केलं जाणार आहे अर्थी गुपचुप हे पोर्टल सुरू होणार नाही आणि गुपचूप याचे अर्ज देखील भरले जाणार नाहीत याच्या संदर्भातील अधिकरज असा अपडेट किरण पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे लवकरच हे पोर्टल सुरू करण्या संदर्भातील तारीख जाहीर केली जाईल त्याच्या संदर्भातील अपडेट दिले जातील त्याच्या संदर्भातील वर्तमान पत्रामधून जाहिरात दिल्या जातील तील आणि हे पोर्टल सर्वांसाठी खुलं केलं जाणार आहे
अद्याप या योजनेच पोर्टल सुरू करण्यात आलेल नाही किंवा कुठल्याही प्रकारे अर्ज भरण्याच्या प्रक्रिया याच्या अंतर्गत सुरू झालेली नाही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडे अद्याप ही योजनेसाठी लागणारी कागदपत्रच उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे वेळ मिळालेली आहे आपल्याला जी काही आवश्यक कागदपत्र आहे ती कागदपत्र तयार करून ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला अनावश्यक असा खर्च करावा लागणार नाही
किंवा आपण अर्ज भरवणी या योजने अंतर्गत अपात्र होणार नाहीत योजनेसाठी काय कागदपत्र लागतात याच्यासाठी अटी शरती पात्रतेचे निकष काय जमीन कशी असावी कोणाच्या नावावरती असावी किती असावी याचबरोबर इतर जी काही लागणारी महत्त्वाचे कागदपत्र या सर्वांबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती दिलेली आहे काही कागदपत्राचे नमुने तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळतील ते डाऊनलोड करून आपण आपल्या विहित फॉर्मॅट मध्ये कागदपत्र तयार करू शकता तर मित्रांनो मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेच्या संदर्भातील हे एक अतिशय महत्त्वाच अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो अर्ज सुरू होण्याच्या संदर्भातील जे काही अपडेट आहे ते अपडेट सुद्धा आपण नक्की आणि सर्वात प्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद
