किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय!
शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजदरामध्ये व वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यात करिता सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली असून अनेक शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज परंतु घेताना त्यांना हे माहीतच नसते की कर्जत किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिले जाते (kisan credit card yojana 2026) हे शेतकऱ्यांकरिता आर्थिक मदतीचे तसेच चांगले साधन आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकाची लागवड तसेच शेतीची मशागत औषधे खते सिंचन तसेच पशुपालन दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन यासारख्या प्रामुख्याने निधी उपलब्ध करून दिला जातो
पिक कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड या मध्ये फरक काय!
अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड व पीक कर्ज हे वेगळे वाटतात परंतु KCC अंतर्गत पीक कर्ज दिले जाते
मुख्य फरक
| बाब | पीक कर्ज | Kisan credit card Yojana |
| उद्देश | एका हंगामासाठी | सतत उपलब्ध कर्ज सुविधा |
| कालावधी | मर्यादित | सहा वर्ष प्रमाणे |
| वाढीचे सुविधा | मर्यादित | दरवर्षी 10 टक्के वाढ |
| वापर | पीक लागवड | पीक +पशुधन +शेती अवजारे |
KCC योजनेत किती अनुदान व्याजदर दिले जाते
सामान्य पीक कर्जावरील व्याजदर 7 ते 8% दरम्यान असतो परंतु सरकारच्या विविध नव्या सवलतीमुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात कर्ज मिळते
व्याज सावलाती :
- केंद्र सरकारकडून 2 टक्के
- व्याज अनुदान वेळेवरती कर्जफेड केल्यानंतर 3 टक्के अतिरिक्त सवलत
- काही राज्यांमध्ये अतिरिक्त व्याज सवलत
यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जवळपास बिनव्याजी किंवा 1 ते 2 टक्के दरम्यान दराने कर्ज उपलब्ध होतात
kisan credit card yojana 2026 किती कर्ज मिळते !
विनातारण कर्ज सध्याच्या नियमाप्रमाणे साधारणपणे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज विनातारण मिळू शकते तारणसह कर्ज यापेक्षा जास्त कर्जासाठी जमिनीचे तारण किंवा आवश्यकता असते काही प्रकरणांमध्ये 2 लाख ते 5 लाखापर्यंत 5 लाख ते 20 लाख रुपये पर्यंत वीस लाख ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज मंजूर केले जाऊ शकते
केसीसी कर्जाची मर्यादा कशी असते
कर्जाची रक्कम खालील बाबींवर अवलंबून असते पिकाचा प्रकार कापूस सोयाबीन ऊस द्राक्ष कांदा भाजीपाला प्रत्येक पिकाकरिता शासनाने प्रतिहेक्टर वेगवेगळे दर निश्चित केलेले असतात क्षेत्रफळ : जितकी जास्त जमीन तितकी अधिक कर्जमर्यादा पूरक व्यवसाय जर शेतकरी खालील व्यवसाय करत असल्यास तर अतिरिक्तकर्ज मिळू शकते कुक्कुट पालन दुग्ध व्यवसाय शेळीपालन मत्स्यव्यवसाय शेतीचे यंत्र सामग्री स्प्रे मशीन ट्रॅक्टर रोटावेटर पंप यासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद केली जाऊ शकते
KCC ची मुदत किती असणार !
आरबीआयच्या सुधारित मार्गदर्शक सूचना प्रमाणे किसान क्रेडिट कार्डची वैधता सहा वर्षांपर्यंत असू शकतात या कालावधीत शेतकरी आवश्यकतेप्रमाणे कर्ज घेऊ शकतो आणि परतफेड करू शकतो
वर्षाप्रमाणे 10 टक्के वाढ कशी मिळते
KCC चा सर्वात मोठा फायदा म्हणजेच खर्च मर्यादित होणारी वाढ उदाहरण :
- पहिल्या वर्षी कर्ज माऱ्यादा 1,50,000
- दुसऱ्या वर्षी 1 लाख 65 हजार
- तिसऱ्या वर्षी 1,81,000
- चौथ्या वर्षी 1 लाख 99 हजार 650
अशा पद्धतीने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दर वर्षी प्रमाणे 10% पर्यंत वाढ दिली जाऊ शकते
केसीसी चे नूतनीकरण कशाप्रकारे होतात
प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला च्या खाते नेहमी ठेवावे लागते नुतनीकरण प्रक्रिया
पिकांची माहिती अपडेट करणे
कर्ज वेळेवरती परतफेड करणे
खाते झिरो बॅलन्स करणे
जमिनीतील बदल असल्यास माहिती देणे
बँक कर्जाची पात्रता तपासून मर्यादित वाढ करते
महत्त्वाच्या लिंक
खात्याची झिरो बॅलन्स करणे म्हणजे काय !
शेतकऱ्याने वर्षातून एकदा संपूर्ण कर्जाची रक्कम परत भरून खाते शुन्य करणे आवश्यक असतात सामान्य संपूर्ण कर्ज फेडावे किमान 24 तास खाते शून्य ठेवावे त्यानंतर पुन्हा कर्ज वापरण्याची सुविधा सुरू होतात
KCC योजनेत पात्रता
खालील प्रमाणे व्यक्ती अर्ज करू शकते संयुक्त शेतकरी गट भाडेकरू शेतकरी वैयक्तिक शेतकरी स्वयंसहायता गट पशुपालक मत्स्य व्यवसाय करणारी शेतकरी
KCC क्रेडिट कार्ड साठी कागदपत्रे
ऑफलाईन अर्जासाठी :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- पॅन कार्ड
- सातबारा उतारा
- आठ अ उतारा
- चतुर सीमा नकाशा
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- अतिरिक्त कागदपत्रे मागू शकतात
kisan credit card 2026 ऑनलाइन नोंदणी 2026
केंद्र सरकारच्या जनसमर्थन पोर्टल मुळे KCC अर्ज प्रक्रिया अधिक पणे सोपी झाली असून यामध्ये आधार क्रमांक फार्मर आयडी याच्या मदतीने जमिनीची माहिती ऑनलाईन पडताळणी केली जाते यामुळे कागदपत्राची आवश्यकता कमी भासते
केसीसी क्रेडिट कार्ड योजनेचे प्रमुख फायदे
कमी व्याजदर बाजारातील इतर कर्जाच्या तुलनेमध्ये खूप कमी व्याजदर त्वरित कर्ज गरजेच्यावेळी निधी उपलब्ध दरवर्षी वाढणारी माऱ्यादा 10 टक्केपर्यंत वाढ अनेक उद्देशासाठी वापर पीक उत्पादन पशुपालन शेती यंत्रसामग्री दूध व्यवसाय आर्थिक सुरक्षितता अचानक कर्जत साठी मदत केसीसी घेताना लक्षात ठेवायच्या प्रत्येक गोष्टी वेळेवर ती कर्जफेड करावी चुकीची माहिती देऊ नका पिकातील बदल बँकेला कळवा खाते नेहमी अपडेट ठेवा कर्जाची मर्यादा पुर्ण वापरण्यापूर्वी गरज तपासा
निष्कर्ष
किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांचा करिता खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त योजना आहे कमी व्याजदरात दरवर्षी वाढणारी कर्ज मर्यादा तसेच सोपी प्रक्रिया आणि विविध शेतीपूरक व्यवसायासाठी उपलब्ध आर्थिक मदत याकरिता kcc हे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे
ज्या शेतकऱ्यांकडे अजून किसान क्रेडिट कार्ड नाही त्यांनी जवळच्या राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेत संपर्क साधून KCC साठी अर्ज करावा योग्य पद्धतीने वापर आणि वेळेवर कर्जफेड केल्यास ही योजना शेती विकासाठी मोठा आधार ठरू शकते
