राज्यांमधील शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत असून खरीप हंगाम 2026 अंतर्गत अनुदानावर वितरित करण्यात येणार्या बियाणाच्या संदर्भातील पात्र लाभार्थ्यांची निवड यादी आज दिनांक 3 जून 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्या यादी मध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांसाठी प्राधान्याने अनुदानावर बियाण्याचे वितरण करण्यात येणार असून त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले होते त्यांनी तात्काळ आपले नाव यादी मध्ये कसे तपासायचे आवश्य तपासणी आवश्यक असेल
खरीप हंगामासाठी राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या बियाण्यासाठी अर्ज केले होते यामध्ये प्रामुख्याने मुग तूर उडीद कापूस सोयाबीन तसेच इतर खरीप पिकाचा समावेश आहे शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे या त्यामध्ये यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते आता या अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रथम प्राधान्य निवड यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे ही यादी शेत आपल्या मोबाईल वरून काही मिनिटांमध्ये सहजपणे पाहू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही
मोबाईल वरून बियाणे अनुदान यादी पाहण्याची पद्धत
सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर स्कीम(mahadbt biyane anudan 2026) च्या अधिकृत पोर्टलवर जावे पुढील पोर्टल उघडल्यानंतर विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यामध्ये अर्जाची सद्यस्थिती निधी वितरण तसेच प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य निवड यादी असे पर्याय उपलब्ध असतात या ठिकाणी (mahadbt biyane anudan 2026) महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य निवड यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे बाब प्रकार निवडा यासाठी सांगितले जाईल तेथे खते,बियाणे, औषधे हा पर्याय निवडावा लागतो
त्यानंतर पुढील स्टेप मध्ये आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर संबंधित तालुका निवडायचा पर्याय दिसेल तालुका निवडल्यानंतर पुढे गाव निवडा चा पर्याय येईल ज्या गावाची यादी पाहायचे आहे ते गाव निवडून शोधा या बटणावर क्लिक करायचे शोधा वर क्लिक केल्यानंतर त्या गावांमधील पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर तुम्हाला दिसेल या यादीमध्ये लाभार्थ्यांचे नाव कोणत्या बियाण्यासाठी पात्र झाले किती प्रमाणात बियाणे मिळणार आहे तसेच अर्ज कोणत्या तारखेला करण्यात आला होता याची सविस्तर माहिती दाखवली जाईल
mahadbt biyane anudan 2026 यादीत नाव असेल तर काय होणार
ज्या शेतकऱ्यांचे नाव यादी मध्ये निवड करण्यात आलेले आहे त्यांना प्राधान्याने बियाणे वितरण करण्यात येणार आहे शासनाच्या नियमानुसार प्रथम निवड यादीतील लाभार्थ्यांना बियाण्याचे वाटप पूर्ण केले जाईल त्यानंतर जर अतिरिक्त बियाणे उपलब्ध राहिले किंवा इतर निधी शिल्लक राहिला तर प्रत्यक्षा यादीतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यामुळे सध्या नाव नसेल तरी शेतकऱ्यांनी नियमितपणे अपडेट पहात राहणे महत्त्वाचे असणार आहे
बियाणे अनुदान वितरण कशाप्रकारे होणार
या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांची संबंधित कृषी सहाय्यक कडून संपर्क साधला जाईल कृषी विभागाच्या माध्यमातून टोकण पद्धतीने बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक सुरू ठेवणे महत्त्वाचे असेल जर कृषी सहाय्यक कडून संपर्क साधण्यात उशीर झाला तरी घाबरणे कारण नाही शेतकरी आपल्या गावातील किंवा परिसरातील कृषी सहाय्यक कार्यालयाची थेट संपर्क करून माहिती मिळवू शकतात
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
अनेक वेळा चुकीचा मोबाईल नंबर अपूर्ण माहिती किंवा नेटवर्क समस्येमुळे शेतकऱ्यांना संदेश मिळत नाहीत यामुळे अर्ज करताना दिलेला मोबाईल नंबर तपासून ठेवावा तसेच नियमितपणे महाडीबीटी पोर्टल वर तपासात राहावे बियाणे वाटप सुरू झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रासह वेळेत उपस्थित राहणे देखील फार गरजेचे आहे अन्यथा पुढील लाभ इतर शेतकऱ्यांना संधी दिली जाऊ शकते
महत्वाची सूचना
| बाब | माहिती |
| लाभार्थी | पात्र असलेले शेतकरी |
| पोर्टल | Mahadbt former |
| वितरण | टोकन पद्धतीने |
| संपर्क | कृषी सहाय्यक यांच्याशी |
| योजना | बियाणे अनुदान योजना 2026 |
निष्कर्ष
खरीप हंगाम 2026 साठी बियाणे अनुदान यादी जाहीर झाल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे तूर,मूग, उडीद सोयाबीन व कापूस पिकासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपले नाव यादीमध्ये तपासणे आवश्यक असते महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येत आहे
त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत (mahadbt biyane anudan 2026) पोर्टलवरील माहितीच तपासावी तुमचे नाव जर निवड यादी मध्ये आले असेल तर लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून संपर्क साधला जाईल आणि टोकण पद्धतीने बियाण्याचे वितरण केले जाईल त्यामुळे पुढील अपडेट साठी आपल्या कार्यालयात संपर्क साधून संपर्कात रहा
mahadbt biyane anudan 2026 : FAQ महत्त्वाचे प्रश्न
प्रश्न 1 बियाणे अनुदान यादी कुठे बघायची
उत्तर: महाडीबीटी फार्मर पोर्टलवर
प्रश्न 2 नाव आल्यावर ती पुढे काय
उत्तर : कृषी सहाय्यकाशी संपर्क ठेवायचा
