Mahadbt farmer scheme : एकात्मिक फलोत्पादन योजनेतून 1000 रनिंग मीटर तार कंपनी साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलच्या माध्यमातून विविध कृषी योजनेचा लाभ दिला जात असतो त्यामध्ये एका फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फळबागाचे संरक्षण करण्याकरिता तार कुंपण fencing या बाबीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील फळबागेचे वन्य प्राण्या पासून इतर प्राण्यांपासून संरक्षण करता यावे याकरिता कुंपण करणे महत्त्वाचे असते

अशा परिस्थितीत महाडीबीटी पोर्टल वर कुंपणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जमीन मोकळी असल्यामुळे तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्याकडे टाईम असतो या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एक एकर फळबागेसाठी जास्तीत जास्त एक हजार रनिंग मीटर पर्यंत तार कुंपन साठी अर्ज करता येतो

या लेखामध्ये आपण महाडीबीटी फार्मर्स पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा कोणत्या पर्याय निवडायचे व सादर करताना किती शुल्क भरावे लागू शकते याची संपूर्ण माहिती घेणार आहोत

एकात्मिक फलोत्पादन योजनेतून तार कुंपणासाठी किती अर्ज करता येतो

एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत कोणत्या घटकासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 1000 रनिंग मीटर पर्यंत प्रस्तावित शेत्र नमूद करून अर्ज करता येतो शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार 1000 रनिंग मीटर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सुद्धा अर्ज करता येऊ शकतो यामुळे अर्ज करतांना आपल्या प्रस्तावित कुंपनाच्या लांबीनुसार योग्य मोजमाप नोंदवणे आवश्यक आहे महत्त्वाचे 1000 मीटर ही अर्जासाठी नमूद केलेली कमाल मर्यादा आहे प्रत्यक्षात अनुदान पात्रता कर्जाचे निकष आणि लाभ मिळवण्याच्या अटी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार असणार आहे

महाडीबीटी तार कुंपण योजना 2026 : तक्ता

तपशील माहिती
योजनेचं नाव एकात्मिक फलोत्पादन योजना 2026
पोर्टलMahaDBT portal
घटककुंपण fencing
अर्जाचा प्रकार ऑनलाइन असणार आहे
कामाला मर्यादा 1000 रनिंग मीटर
अर्ज शुल्क 23.60 पोर्टल शुल्क अनुसार
लॉगिन साठी आवश्यक Farmer ID and OTP
अर्जाची निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीप्रमाणे
पुढील प्रक्रियापूर्वसंमती आणि मग काम
योजनेचे अधिकृत पोर्टल महाडीबीटी पोर्टल

तार कुंपण योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया?

महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर शेतकरी स्वतःच्या मोबाईल वरून सुद्धा अर्ज करू शकतात अर्ज करताना पुढील प्रक्रिया पूर्ण करा

1). महाडीबीटी फार्मर पोर्टल वर लॉगिन करा

सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपल्या महाडीबीटी फार्मर स्कीम च्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी त्यानंतर वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉगीन करण्याचा पर्याय निवडावा येते आपला फार्मर आयडी टाकून ओटीपी च्या माध्यमातून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लॉगिन झाल्यानंतर पोर्टल वरती शेतकऱ्याची वैध माहिती आणि शेती संबंधित तपशील दिसतील

2). घटकासाठी अर्ज करा हा पर्याय निवडा

लोगिन केल्यानंतर मुख्य डॅशबोर्डवर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा असा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर विविध कृषी योजनेचे घटक उपलब्ध होतील तुम्हाला फलोत्पादन हा पर्याय निवडायचा आहे

3). फलोत्पादन योजनेतील आवश्यक माहिती निवडा

फलोत्पादन हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा फार्मर आयडी शेत असलेल्या गावाचे नाव आणि इतर विषय तपशील दिसतील तुमची शेती एका पेक्षा जास्त गावांमध्ये असल्यास त्या गावातील शेती साठी अर्ज करायचा आहे ते गाव निवडायचे त्यानंतर घटक तपशील प्रकार निवडायचा पर्याय दिसेल तेथे उपलब्ध पर्यायांमधून इतर घटक हा पर्याय निवडायचा आहे

4). कुंपन fencing हा घटक निवडावा

इतर घटक निवडल्यानंतर विविध बाबी ची यादी दिसेल यामध्ये हरित ग्रह शेडनेट आणि इतर फळे उत्पादनाशी संबंधित बाबी उपलब्ध असतात या यादीमध्ये तुम्हाला तार कुंपण पण हा पर्याय शोधायचा आहे काही वेळा पोर्टल वर इंग्रजी भाषेमध्ये पर्याय दिसू शकतो अशा वेळी fencing या नावाने उपलब्ध असलेले पर्याय निवडावा कुंपण हा घटक निवडल्यानंतर संबंधित उपघटक निवडायची प्रक्रिया पूर्ण करावी

5). प्रस्तावित क्षेत्र एक हजार रनिंग मीटर नोंदवा

कुंपण हा घटक निवडल्यानंतर पुढील माहिती भरण्यासाठी पर्याय उपलब्ध होतील ते तुम्हाला प्रास्ताविक क्षेत्र नोंदवायचे आहे तार कुंपन साठी जास्त 1000 रनिंग मीटर पर्यंत अर्ज करता येतो असल्याने पात्रतेनुसार 1000 हा आकडा नोंदवू शकता उदाहरणार्थ 500 रनिंग मीटर कुंपण आवश्यक असल्यास 500 नोंदवा 700 रनिंग मीटर आवश्यक असल्यानंतर 700 निवडावा एक हजार रनिंग मीटर आवश्यक असल्यास 1000 नोंदवा माहिती भरल्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही निवडलेले गटात यशस्वीरित्या जतन झाल्यानंतर आणखी एकदा घटक निवडायचा आहे का असा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा घटक निवडायचा नसल्यास No हा पर्याय निवडावा

6). निवडलेल्या घटकासाठी अर्ज सादर करा

लक्षात ठेवा केवळ घटक निवडून जतन केल्याने तुमचा अर्ज अंतिम नोंदणी सादर होत नाही त्यासाठी पुन्हा मुख्यपृष्ठावर जाऊन अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा त्यानंतर तुम्ही निवडलेल्या बाबी यादी दिसेल तेथे हा पहा या पर्यायावर क्लिक करून अर्जामध्ये निवडलेल्या कुंपण या घटकांची माहिती तपासून घ्यावी सर्व माहिती योग्य असल्याची खात्री केल्यानंतर खाली दिलेली स्वयंघोषणा काळजीपूर्वक वाचून आणि त्यानंतर समोरील टिकमार्क त्यानं जर अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करावे

7). ऑनलाइन अर्ज साठी 23 रुपये 60 पैसे भरावे

अर्ज सादर करण्याच्या प्रक्रिया नंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पृष्ठावर पाठवले जाईल तेथे अर्ज शुल्क भरून 23 रुपये 60 पैसे भरण्याचा पर्याय तुम्हाला दिसू शकतो करण्यासाठी उपलब्ध पेमेंट निवडावा त्यानंतर नेटबँकिंग किंवा उपलब्ध असलेले इतर पेमेंट पर्याय च्या माध्यमातून पैसे भरता येऊ शकते यूपीआय द्वारे पेमेंट काढायचे असल्यास यूपीआय पर्याय निवडावा क्यू आर कोड स्कॅन करता येतो Google Play किंवा इतर यूपीआई ॲपच्या माध्यमातून सुद्धा पेमेंट पूर्ण करता येऊ शकते यशस्वी झाल्यानंतर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होते

अर्ज केल्यानंतर पुढे काय होणार?

महाडीबीटी पोर्टल वर कुंपण या घटकासाठी अर्ज सादर केल्याने शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणी आवश्यक आहे अर्ज केल्यानंतर संबंधित घटकांची माहिती पोर्टलवर अर्ज घटक तपशील विभागांमध्ये पाहता येते या योजनेमध्ये निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने होत असल्यास संबंधित क्षेत्र चा निकाल आणि अर्जाची स्थिती तपासावी लॉटरी मध्ये शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी सूचना दिल्या जातात त्या पूर्वसंमती मिळवणे आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि त्यानंतर नियमानुसार प्रत्यक्ष काम पूर्ण करणे अशा बाबींचा समावेश असू शकतो

महत्त्वपूर्ण सूचना : संमती मिळाल्यावर पूर्वी कुंपणाचे काम सुरू करू नये किंवा साहित्य खरेदी करू नये योजनेच्या अधिकृत पोर्टल व संबंधित विभागाकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करावे

तार कुंपण योजनेसाठी अर्ज करताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी

  • अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे
  • ओटीपी च्या माध्यमातून लॉगीन प्रक्रिया पूर्ण करावी
  • अर्ज करताना योग्य गाव आणि शेती ची माहिती निवडावी
  • फलोत्पादन विभागाच्या इतर घटक अंतर्गत कुंपण fencing हा पर्याय निवडावा
  • प्रस्तावित क्षेत्राची नोंद करताना योग्य रनिंग मीटर नमूद करावेत
  • अर्जाची माहिती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वयंघोषणा आणि आवश्यक पेमेंट करणे महत्त्वाचे आहे
  • अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती आणि लॉटरी ची माहिती तपासात राहावी
  • अनुदान मिळवून यापूर्वी संबंधित विभागाची पूर्वसंमती आणि अधिकृत सूचना तपासाव्यात

महाडीबीटी तार कुंपन योजना 2026 FAQ

1) महाडीबीटी एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत किती रनिंग मीटर तार कुंपणासाठी अर्ज करता येतो

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एक हजार रनिंग मीटर पर्यंत तार कुंपणासाठी अर्ज करता येतो

2) महाडीबीटी तार कुंपन योजनेसाठी कोणता पर्याय निवडावा

लोगिन केल्यानंतर घटकासाठी अर्ज कराया पर्याय मधून फलोत्पादन योजनेअंतर्गत इतर घटक आणि कुंपण फेन्सिंग हा पर्याय निवडावा

3) तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोठे करायचा?

शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्म स्कीम च्या मध्ये अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज करता येतो

4) तार कुंपणासाठी 1000 मीटर पेक्षा कमी क्षेत्रासाठी अर्ज करता येतो का?

होय शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार 1000 रनिंग मीटर पेक्षा कमी क्षेत्रफळ सुद्धा अर्ज करता येतो

5) महाडीबीटी तार कंपनी योजनेसाठी अर्ज शुल्क किती आहे

तुमच्या पोर्टलमध्ये दाखवलेल्या प्रक्रियेनुसार अर्जासाठी 23 रुपये 60 पैसे ऑनलाईन शुल्क आकारले जाते अर्ज करताना पोर्टल वर दिसणार शुल्क तपासावे

6) महाडीबीटी तार कुंपण योजनेसाठी फार्मर आयडी आवश्यक आहे का

होय पोर्टलवर शेतकरी म्हणून लोगिन साठी फार्मर आयडी आणि ओटीपी आवश्यक असते

7) तार कुंपण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर अनुदान लगेच मिळते का

नाही अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया आणि लॉटरीची प्रक्रिया पूर्ण होते निवड झालेल्या शेतकर्‍यांना पुढील कार्यवाहीसाठी पूर्वसंमती आणि इतर आवश्यक सूचना दिल्या जातात

8) लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर काय करावे लागते

लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर संबंधित विभागाच्या सूचनेनुसार पूर्व संमती घ्यावी नंतरच नियमानुसार पुढील कामकाज आणि कुंपणाची उभारणी करावी

9) अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची

पोर्टलवर लॉगिन करून अर्जाची स्थिती निवडलेल्या घटक लॉटरी संबंधित माहिती तपासता येते

10) पूर्वसंमती मिळण्यापूर्वी तार कुंपणचे काम सुरू करता येते का

पूर्वसंमती ची पूर्वसंमती मिळाल्या पूर्वी काम सुरू करू नये संबंधित विभागाकडून मिळालेल्या अधिकृत सूचना नुसारच काम करावी

महाडीबीटी पोर्टल अधिकृत लिंक

शेतकरी बांधवांना तार कुंपणासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्म पोर्टलला भेट देता येईल

असा करा ऑनलाईन अर्ज 👇👇

अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

निष्कर्ष

एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत कुंपण या घटकासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे तिचा जास्तीत जास्त एक हजार रनिंग मीटर पर्यंत प्रस्तावित क्षेत्र नमूद करुन अर्ज करता येतो अर्ज करताना फलोत्पादन इतर घटक आणि कुंपण fencing हे पर्याय योग्य पद्धतीने निवडणे आवश्‍यक आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपल्या फाईल च्या संरक्षणासाठी तार कंपनी करायचे आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर उपलब्ध पर्याय आणि योजनेच्या अटी तपासून अर्ज करावे अशाच शेती विषयक योजना आणि अनुदान आणि शासनाच्या महत्वाच्या अपडेटसाठी Agroyojana.com वेबसाईटला नियमित भेट देत राहा

Leave a Comment